दत्त गोरक्ष आदिकरुनि I सिध्द भिक्षा मागती जनी II
नि:स्पृहता भिक्षेपासोनी I प्रगट होये II

संत श्रेष्ठ नाम देव म्हणतात :
नामा म्हणे राम ओंकाराचा मूळ I परब्रह्म केवळ रामनाम I
नामा म्हणे राम व्यापी त्रिभुवन नाम हे निधान कलियुगी II

श्री समर्थांचा राम :
तेजस्वी, प्रेमळ, सुंदर, लोभस, सामर्थ्याचा संकल्प एक असे उर्जा स्त्रोत ज्यायोगे
भिक्षा परंपरा आणि समाज जागृती श्री रामदास रुपी अवतरली आहे.

दिनाचा दयाळू मनाचा मवाळू I स्नेहाळू कृपाळू जनी दासपाळू I
तया अंतरी क्रोध संताप कैचा I जगी धन तो दास सर्वोत्तमाचा II

श्री रामदास स्वामींचे वर्णन करणारा संत तुकारामांचा अभंग :
हूरमुजी रंगाचा उंच मोती दाणा I रामदासी बाणा या रंगाचा II
पीतवर्ण कांती तेज अघटीत आवळू शोभत भृकुटीमाजी II१II
काष्ठाच्या पादुका स्वामींच्या पायात I स्मरणी हातात तुळशीची I
रामनाम मुद्रा द्वादश हे केले I पुछ वळवळे कटी माजी II२II
कौपिन परिधान मेखला खांद्यावरी I तुंबा कुबडी करी समर्थांचा I
कृष्णा तटकाठी जाहले दर्शन I वंदिले चरण तुका म्हणे II३II

“Shri. Samartha Ramdas Swami” with 12 yrs of tapsya and great spiritual power has established 1100 math (मठ)/ centre nationwide in India. There teachings contributed a lot to retain Indian values, culture, and socialism (Maharashtravad). “Manache Shlok” wel known in each home which made everyone to have humanity values right from routes.