एकूण समर्थांच्या जीवन व कार्याचा सर्व पैलूंचा सखोल विचार केल्यास 'राष्ट्र गुरु' या संज्ञे खेरीज अन्य कोणतेही विशेषण त्यांच्या आकाशासारख्या व्यापक, हिमालयासारखा सुदृढ व्यकिमत्वास अभिव्यक्त करण्यास पुरत नाही, असे जाणवते. परमेश्वराविषयी उत्कट भक्ती, ईश्वरी साक्षातकारची अनुभूती व जीवामात्रांविषयी प्रेमात्मक करुणा ही संतलक्षणे त्यांच्या व्यक्तीमत्वात पूर्णपणे दृग्गोचर होत असल्यामुळे ते संत आहेतच, अन्य कोणी संतानी जे केले व सांगितले ते सर्व त्यांच्या जीवनात असूनही त्यांच्या पेक्षा बरेच काही अधिक आहे. त्यामुळे संत हे विशेषण त्यांना पुरेसे नाही.
कोणी त्यांना राजगुरू असेही म्हंटले आहे. इतिहासाचा मागोवा घेत अगदी महर्षी वसिष्ठान सारख्या सर्व श्रेष्ठ राजगुरू चे कार्यही राजाला मार्गदर्शन करण्यापुरते मर्यादित राहिलेले दिसते. राज्यातील सर्व थरातील सामान्य लोकाशी त्यांचा प्रत्यक्ष संबंध असलेला दिसत नाही. त्यांच्यात मिसळून संघटन उभे करणे तर फारच दूर. तर हाही शब्द फारच थिटा आहे. आणखी एक महत्वाची गोष्ट म्हणजे राजगुरूंचा संबंध एखाद्या विशिष्ट राजघराण्याशी आणि त्यातीलही काही पिढ्यांशीच केवळ असतो.
श्री समर्थांनी केलेले कार्य व मार्गदर्शन स्थलकालाच्या या सर्व सीमा ओलांडून पुढे जाणारे आहे.
श्री शिव छत्रपतींच्या कार्यास अनुकूल असे महाराष्ट्र धर्माचे जागरण त्यांनी केले व सक्रिय भक्तीचा वन्ही चेतवून समाज घडविला आणि स्वदेशासाठी आत्मविश्वासाने उभा केला. म्हणून स्वा. सावरकरांनी जोसेफ मॅझीनीला इटलीचा रामदास व समर्थांना इटलीचा मॅझीनी असे म्हंटले आहे व ते अत्यंत ओचित्यपूर्ण आहे. तरी यापुढे जाऊन असे म्हणावेसे वाटते की, कोणतेही राष्ट्र घडवायचे असल्यास त्या राष्ट्रातील सामान्य व्यक्तीला व राज्यातील सर्व संस्थाना विविध स्तरांवरील नेत्यांना आणि राजाला आणि राजगुरूंना देखील जे ऐहिक व पारमार्थिक मार्गदर्शन नेहमीच आवशक असेल ते सर्व समर्थांच्या कार्यात व साहित्यात उपलब्ध होते. इतिहासातील अन्य कोणाही विभूतींच्या जीवन कार्यात ते दिसत नाही. म्हणून ते खरोखरच भाग्यवान, ज्यांनी ज्या राष्ट्र गुरूच्या मार्गदर्शनाने स्वतःचे व समाजाचे जीवन धन्य केले. या थोर विभूतींचे कृतज्ञतेने स्मरण करतांना म्हणावेसे वाटते,
तव स्मरण संतत स्फुरणदायी आम्हा घडो I
त्वदीय गुण कीर्तन्ध्वनी सद्व करणी पडो I
स्वधर्माहितचितनवीण दुजी कथा नावडो I
तुझ्या समचि आमुची तनुहि देव्कायी पडो II
(पु. स्वामी गोविन्दागिरी, पा. क्र ९८ शिव समर्थ योग)
अचूक यत्न करवेना I म्हणौन केले ते सजेना I
आपला अवगुण जाणवेना I काही केल्या II
(दासबोध १२-२-६)
विषय जनित जेजे सुख I तेथेचि होते परम दुख: II
पूर्वी गोड अंती शोक I नेमस्त आहे II
(दासबोध ३-१०-६५)
जगीं बद्ध अज्ञान ते सिद्ध केले I बहु संत ते महंत होऊन ठेले
कृपा आगळी सोम्या लीळा जयाची I जागी धन्य ते कीर्ती कल्याण ज्याची II
महिमंडळी राम उपासना हो I बहु नेटकी शुद्ध दीक्षा जन हो I
प्रीती लाविली भक्ती त्या राघवाची I जगी धन्य ते कीर्ती कल्याण ज्याची II
True learning is always an asset which can’t be measured with anything in world. For sure these assets are achieved with the blessings of SADGURU & following teachings and to accept GURUTATTVA which is a universal truth.
काही शिष्यांविषयी;
Follower’s link